‘एक गाव, एक गणपती’ योजना प्रभावीपणे राबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:13+5:302021-09-06T04:43:13+5:30
आटके टप्पा येथे आयोजित कऱ्हाड तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाची आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक ...

‘एक गाव, एक गणपती’ योजना प्रभावीपणे राबवा!
आटके टप्पा येथे आयोजित कऱ्हाड तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाची आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, उदय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपअधिक्षक रणजित पाटील म्हणाले, गणेश मंडळांनी अनाठायी खर्च टाळून पूरग्रस्त गरजूंना मदत करावी. शासनाच्या अटी व नियमांचे भंग झाल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी सर्व गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव काळात मार्गदर्शक सूचना व अटी-नियमांचे पालन करून साधे पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक मूर्ती ही चार फूट उंचीची व घरगुती मूर्ती ही दोन फूट उंचीची असावी. तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी गणेश मंडळे उभी करू नयेत. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता गर्दी न करता समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे. मूर्तीच्या सरंक्षणात कायमस्वरूपी स्वयंसेवक उपस्थित ठेवावे. तसेच गणेशोत्सव आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये व गुलालाचा वापर करू नये अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी सुमारे १२५ गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पोलीस पाटील उपस्थित होते.
फोटो : ०५केआरडी०१
कॅप्शन : आटकेटप्पा, ता. कऱ्हाड येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांचे भाषण झाले.