शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:22+5:302021-09-12T04:44:22+5:30

कऱ्हाड : ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या ...

Implement the old pension scheme for teachers and non-teaching staff | शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

कऱ्हाड : ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कऱ्हाड तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

समाजातील महत्त्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले आणि तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेला वेतन प्राप्त व्हावे, परिविक्षाधीन सहायक शिक्षक, परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करा, सीबीएसई शाळेतील शिक्षकांसाठी शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, अनिल शिर्के, अशोक सोमदे, तानाजी पवार, विशाल साळुंखे, संतोष अंबवडे, शुभांगी कोरडे, भारती निकम यांच्यासह कऱ्हाड दक्षिणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो

कऱ्हाड येथे शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना देताना भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी.

Web Title: Implement the old pension scheme for teachers and non-teaching staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.