राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी लागू करा : खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:51+5:302021-05-23T04:38:51+5:30
सातारा : राज्यामध्ये लॉकडाऊन करून देखील कोरोनाबाधितांची संख्या थांबवणे शक्य झालेले नाही. आता राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी लागू करून गावनिहाय ...

राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी लागू करा : खंडाईत
सातारा : राज्यामध्ये लॉकडाऊन करून देखील कोरोनाबाधितांची संख्या थांबवणे शक्य झालेले नाही. आता राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी लागू करून गावनिहाय तपासण्या आणि लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
खंडाईत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची उपासमार होते आहे. हातावर पोट असणारे लोक घरात बसून राहिले आहेत. लोक भुकेने व्याकूळ झाले असताना केवळ लॉकडाऊन करून कोरोना रोखता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीमध्ये शासनाने महत्त्वपूर्ण आणि उपयोगी असा निर्णय घेणे योग्य ठरेल. शासनाने आता जिल्हाबंदी लागू करून तिसरी लाट रोखण्यासाठी निर्णय घ्यावा.
प्रत्येक गावामध्ये वाॅर्डनिहाय कोरोनाच्या तपासण्या आणि लसीकरण केंद्रे सुरू करावीत, तसेच जे लोक बाधित आढळतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केले तर तिसरी लाट रोखणे शक्य होईल.