कोयना पोलिसांकडून बेकायदेशीर दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:01+5:302021-07-20T04:26:01+5:30
कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील शिरळ गावच्या हद्दीत बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्याविरोधात कोयनानगर पोलिसांनी कारवाई करून ९ हजार ३३० ...

कोयना पोलिसांकडून बेकायदेशीर दारू जप्त
कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील शिरळ गावच्या हद्दीत बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्याविरोधात कोयनानगर पोलिसांनी कारवाई करून ९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरळ (ता. पाटण) येथील एका हॉटेलसमोर बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याची माहिती कोयना पोलिसांना मिळाल्याने कोयना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. यामध्ये विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ३६ बाटल्या व देशी दारूच्या १८० मिलीच्या ६५ बाटल्या अशा ९,३३० रुपयांच्या १०१ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलीस कर्मचारी शिवाजी भिसे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी संजय यशवंत कांबळे (वय ४६, रा. मळे, कोयनानगर) याच्याविरुद्ध कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास हवालदार एस. एस. बोबडे करत आहेत.