शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Satara Politics: खोडा घालू नका, युती धर्म पाळा, अन्यथा.. मंत्री शंभूराज देसाईंचा 'भाजप'ला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:51 IST

'मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे'

सातारा : महायुतीमध्ये एकत्र असतानाही कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो आम्ही किती दिवस सहन करायचा? असा सवाल करत शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला सणसणीत इशारा दिला. असे कृत्य करणाऱ्यांना ‘जशास तसे उत्तर’ द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मेढा येथे शिवसेनेच्या वतीने शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून माझ्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. धनुष्यबाण हा महायुतीचाच आहे, तरीही महायुतीतील लोक धनुष्यबाण असलेले बोर्ड काढायला लावत असतील, तर हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा? आम्ही सामंजस्याची भूमिका घेत असू, तर आमच्याच लोकांना त्रास देणे चुकीचे आहे.मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे,’असा इशारा देत ते म्हणाले, माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला, तर मला पालकमंत्र्यांच्या भूमिकेतून बाहेर यावे लागेल. पक्षामध्ये खासदार, आमदार यांच्यापेक्षा मोठा सर्वसामान्य शिवसैनिकच आहे. मेढा असो वा कुठलाही शिवसैनिक, त्याच्या पाठीमागे पालकमंत्री म्हणून मी ठामपणे उभा राहणार आहे.

शिवसेनेची अवहेलना करू नका..आगामी निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणूनच लढायचे आहे, पण शिवसेनेची ताकदही कायम राखायची आहे, शिवसेनेचा मान-सन्मान जपायचा आहे. जर शिवसेनेची अवहेलना केली, शिवसैनिकाला तुच्छ लेखले किंवा दमदाटी केली, तर शिवसेना स्वबळावर लढून आपली ताकद काय आहे हे दाखवून देईल. शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्त्वाचा आहे, असेही मंत्री देसाई म्हणाले.

भूमिका वेगळी असू शकते..पदाधिकाऱ्यांनी गाफिल राहू नये, असा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की, महायुतीचा प्रयोग करताना शिवसेनेचा अपमान होईल, तिची ताकद कमी होईल, किंवा शिवसैनिकाला त्रास होईल हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. चर्चेतून मार्ग न निघाल्यास शिवसेनेची भूमिका वेगळी असू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Politics: Desai warns BJP to respect alliance or else!

Web Summary : Minister Shambhuraj Desai warned BJP against obstructing works despite being in alliance. He cautioned against disrespecting Shiv Sainiks. Desai hinted at a potential solo fight if Shiv Sena's dignity is compromised. He emphasized Shiv Sena's strength and self-respect.