शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

राज्य सरकार पडणार हे तर कार्यकर्त्यांसाठी गाजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 06:03 IST

अजित पवार ; सरकार न बनल्याचं दुखणं

कऱ्हाड : ‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थिर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजप करीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, कार्यकालही पूर्ण करेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळास आदरांजली वाहण्यास उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ते म्हणाले,  सत्तेवर कोणीही असले तरी विरोधी पक्षाला मात्र सरकार पडणार, असे म्हणावेच लागते. १९९५ मध्ये आमचे ८० आमदार होते. आम्ही विरोधात होतो. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरावे लागते. तेच आता भाजप करते आहे. विरोधकांना कार्यकर्ते सोबत ठेवायचे असतात. त्यासाठी सरकार पडणार, असे म्हणावेच लागते. ज्येष्ठ नेते  शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे.

केंद्र पाठीशी नाही! कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. केंद्राकडून २९ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी वारंवार पत्र पाठवूनही त्याची दखल घेतली गेली नाही. नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभे राहिलेले नाही, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा