तो गाडीतच गेला तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:15+5:302021-09-17T04:47:15+5:30

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका चौकात एक मद्यपि भर रस्त्यातच पडला होता. काही वेळात त्याच्या नाका-तोंडांतूून रक्त वाहू लागले. तो ...

If he got in the car ... | तो गाडीतच गेला तर...

तो गाडीतच गेला तर...

काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका चौकात एक मद्यपि भर रस्त्यातच पडला होता. काही वेळात त्याच्या नाका-तोंडांतूून रक्त वाहू लागले. तो जोरजोेरात रस्त्यावर डोके व पाय आपटू लागला. काही तरुणांना त्याची ही तडफड बघविली नाही. काहींनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. तर काहींनी पोलिसांना कळविले. दहा मिनिटांनंतर एका डॉक्टर महाशयांची गाडी या चौकात आली. डॉक्टर गाडीतून उरतले त्या मद्यपीला लांबूनच पाहिलं अन् निघून गेले. काही वेळांत पोलीस गाडी आली. तरुणांनी पोलिसांना ‘तुमच्या गाडीत याला घेऊन जावा की’ असं सांगितलं. यावर संबंधित कर्मचाऱ्याने ‘आम्हाला नेता येत नाही. तर तो गाडीतच गेला तर’ पोलिसांच्या या उत्तरानंं तरुणही अचंबित झाले. अखेर रुग्णवाहिका आली आणि मद्यपीला रुग्णालयात घेऊन गेली.

Web Title: If he got in the car ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.