आदर्शवत माळी महासंघ उभा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:44+5:302021-02-05T09:12:44+5:30
येथील शासकीय विश्रामगृहावर राज्यस्तरीय माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस अॅड. दीपक माळी, राज्य ...

आदर्शवत माळी महासंघ उभा करणार
येथील शासकीय विश्रामगृहावर राज्यस्तरीय माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस अॅड. दीपक माळी, राज्य सचिव प्रवीण जांभळे, सांगली युवक अध्यक्ष प्रताप माळी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप माळी, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रवीण माळी, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब चपाले उपस्थित होते.
भानुदास माळी म्हणाले, दिवंगत शिवाजीराव माळी यांनी लावलेल्या माळी महासंघाच्या रोपट्याला आपल्याला मोठ्या वटवृक्षामध्ये उभे करायचे आहे. आपल्याला संपूर्ण राज्यात माळी महासंघ उभा करायचा आहे; पण त्याबरोबरच राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, बांधकाम, कायदेविषयक या क्षेत्रात संघटना उभी करायची आहे.
यावेळी राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये राज्य उपाध्यक्षपदी विजय माळी, सातारा जिल्हाध्यक्षपदी संपतराव माळी, उपाध्यक्षपदी हरिदास माळी, कऱ्हाड उत्तर अध्यक्ष राजकुमार माळी, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विशाल माळी, जिल्हा संघटक महादेव माळी, जिल्हा कार्यकारिणी सुरेश माळी, हातकणंगले तालुकाध्यक्ष योगेश माळी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष किसन माळी, शिवाजीराव विधाते, आनंदराव माळी, विकास कारंडे, संजय माळी, अॅड. रोहित माळी उपस्थित होते.
फोटो : ०३केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत माळी महासंघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.