आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे सहकारात आदर्शवत काम : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:13+5:302021-01-08T06:04:13+5:30

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, ...

Ideal work in collaboration with Anandrao Chavan Patsanstha: Chavan | आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे सहकारात आदर्शवत काम : चव्हाण

आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे सहकारात आदर्शवत काम : चव्हाण

मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, संचालक शांताराम पाटील, सर्जेराव पाटील, सुरेश मोहिते, दिनकर साखरे, शाखाप्रमुख सुनील गिरीगोसावी, आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्थेने सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले आहे. सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच आज या संस्थेची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित पाटील यांनी संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

हिंदुराव पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. अभिजित पाटील यांनी स्वागत करून आभार मानले. (वा. प्र.)

फोटो : ०५केआरडी०१

कॅप्शन : मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण येथे आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.

Web Title: Ideal work in collaboration with Anandrao Chavan Patsanstha: Chavan