आदर्श शिक्षक पुरस्काराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:47+5:302021-09-17T04:45:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे येथील एका संस्थेमार्फत दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार महाबळेश्वर येथील गिरिस्थान ...

आदर्श शिक्षक पुरस्काराने
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे येथील एका संस्थेमार्फत दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार महाबळेश्वर येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुधाकर शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
पाचगणी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पाचगणी पालिकेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, महाबळेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, प्राचार्य मुकुंद माळी, शहाजहान शेख आदी उपस्थित होते.
प्रा. शिंदे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे येथे अभ्यास मंडळ सदस्य तथा संपादक मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रा. शिंदे यांचे कौतुक केले.
फोटो : १६ सुधाकर शिंदे
पाचगणी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रा. सुधाकर शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.