सातारकरांसोबत डान्स करायला मला नक्कीच आवडेल : सिद्धेश पै
By Admin | Updated: December 29, 2014 23:54 IST2014-12-29T22:14:22+5:302014-12-29T23:54:42+5:30
लहान मुले, तरूण अन् तरुणींसाठी स्वतंत्र बॅच

सातारकरांसोबत डान्स करायला मला नक्कीच आवडेल : सिद्धेश पै
सातारा : पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीच्या कार्यशाळेत सातारकरांसोबत डान्स करायला मला नक्कीच आवडेल, अशी भावना ‘डान्स इंडिया डान्स’ फेमस सिद्धेश पै यांनी व्यक्त केली आहे. येत्या २ जानेवारीपासून ते साताऱ्यात कार्यरत असणार आहेत.
पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘डान्स इंडिया’ या नृत्य स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये इतर रनर ग्रुप ठरलेला आणि पुढच्या प्रत्येक सिझनमध्ये स्किपर (नृत्यप्रशिक्षक) असलेला लोकप्रिय सिद्धेश पै २ जानेवारी पासून पुढे सलग दहा दिवस सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहे.
यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसून साडेतीन वर्षांच्या पुढील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊन नृत्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो.२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५ या १० दिवसांच्या कालावधीत दुध संघ हॉल, सातारा कॅर्फे जवळ पोवई नाका सातारा येथे कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. लोकमतच्या सखी मंच, बालविकास मंच, आणि युवानेक्स्ट च्या सभासदांसाठी प्रशिक्षण फी मध्ये ५००/- रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शुल्क इतरां करता २५००/- आणि लोकमतच्या सभासदांकरता २०००/- रूपये प्रवेश शुल्क घेतले जाणार आहे. कार्यशाळा संपल्यानंतर प्रसिध्द नृत्य प्रशिक्षक सिद्धेश पै सोबत स्टेज शोमध्ये नृत्य करण्याची संधी मिळणार आहे.
महिला व लहान मुलांच्या स्वतंत्र बॅचेस केल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी कमानी हौदाजवळ सातारा आणि ९७६४४०६४६४, ९७६२५२७१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
लहान मुले, तरूण अन् तरुणींसाठी स्वतंत्र बॅच
रोज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांसाठी प्रत्येक तासाला तीन बॅचेस होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत साडेतीन ते सात वर्षे वयोगटातील मुलांसाठी, सायंकाळी ६ ते ७ या कालावधीत आठ ते चौदा वयोगटासाठी नृत्य शिकवले जाणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पंधरा ते एकवीस आणि रात्री ८ ते ९ या कालावधीत बावीस वर्षांपुढील तरुणांसाठी ही नृत्यशाळा होणार आहे.
हॉटेल राधिका पॅलेस, अॅम्बिशन क्लासेस, भाग्योदय ड्रेपरी, चकोर बेकरी आणि बँक आॅफ महाराष्ट्र यांनी सहकार्य केले आहे.