कामथीच्या विकासकामांकरिता बांधिल राहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:16+5:302021-08-15T04:40:16+5:30
औंध : प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून खटावच्या उजाड माळरानाला हिरवा शालू नेसवण्याचे स्वप्न साकार झाले आहे. तुमच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव ...

कामथीच्या विकासकामांकरिता बांधिल राहीन
औंध : प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून खटावच्या उजाड माळरानाला हिरवा शालू नेसवण्याचे स्वप्न साकार झाले आहे. तुमच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे. तुम्ही कधीही हाक मारा, विकासकामासाठी तुमच्या मदतीला धाऊन येण्याची बांधिलकी राहील,’ अशी ग्वाही वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी दिली.
कामथी (ता. खटाव) येथे जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम यांच्या प्रयत्नातून १५ वित्त आयोगातून मंजूर झालेल्या बंदिस्त गटार कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच गजानन भिसे संजय पवार, तानाजी होळकर, छगन भिसे, चंद्रकांत पवार, सदाशिव मोरे, रूपेश ताटे, योगेश पवार, दत्तात्रेय आढागळे, सर्जेराव पवार, शंकर ताटे, नारायण कारबाळ, योगेश होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले, ‘पुसेसावळी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सुनीता कदम यांनी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव आणि वाडी-वस्तीपर्यंत विकासकामे पोहोचवली आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कामथी ग्रामस्थांनी गावच्या अडीअडचणींबाबत कधीही हाक मारावी.’
फोटो:- कामथी (ता. खटाव) येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी विक्रमशील कदम. शेजारी गजानन भिसे व ग्रामस्थ.