रहिमतपूर : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा लढला, झगडला, पडला. पंधरा वर्षे संघर्ष केला. मग मनोज घोरपडे आमदार झाले. परंतु सामान्य घरातला आमदार झालेला मंत्री झालेला तुम्हाला बघणार नाही. कारण, आम्ही प्रस्थापित नाही ना? अशा शब्दांत मंत्री जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पलटवार केला.
वाचा : पहिल्यांदा आमदार झालेले अर्ध्या हळकुंडाने पिवळे : अजित पवाररहिमतपूर नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार मनोज घोरपडे, म्हणाले, सत्ताधाऱ्यांची पंचवीस वर्षे पालिकेत सत्ता आहे. दरवर्षी तोच तोच जाहिरनामा फिरतो आहे. विकासाच्या पोकळ गप्पा ते मारत आहेत. चौकात उजेड असला तरी गल्लीबोळात अंधार आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, चित्रलेखा माने-कदम यांची भाषणे झाली.