शहरं
Join us  
Trending Stories
1
चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन
2
अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले
3
बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा
4
युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  
5
केएल राहुलने सासरा सुनील शेट्टींसोबत मुंबईजवळ खरेदी केली ७ एकर जमीन; काय आहे किंमत?
6
'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
7
"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल
8
आरोग्य सांभाळा! चहा आणि कॉफी किती वेळानंतर होते खराब? निष्काळजीपणा ठरेल घातक
9
'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका
10
गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, बाळाची पहिली झलक दाखवत नावही सांगितलं
11
"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल
12
ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा
13
"मला तैमूर अन् जेहबद्दल खूप वाईट वाटतं", असं का म्हणाला इब्राहिम अली खान?
14
दुबईतील बेकरीमध्ये घुसून ३ भारतीयांवर पाकिस्तानी व्यक्तीने केला तलवारीने हल्ला; दोघांचा मृत्यू
15
क्रूरतेचा कळस! रुग्णाला फरफटत नेलं अन् बेदम मारलं; रिहॅबिलिटेशन सेंटरमधील भयंकर घटना
16
'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार
17
देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस
18
अवघ्या ११२ धावांचा पाठलाग न जमल्याने KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे निराश, म्हणाला...  
19
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹२,००,००० ची FD केली तर २ वर्षानंतर किती रक्कम मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
20
TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय

Satara Politics- घडतंय बिघडतंय: 'अतुलबाबां'चा चिमटा, 'उदयदादां'ची चुप्पी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:10 IST

कार्यकर्त्यांच्यात रंगताहेत खुमासदार चर्चा 

प्रमोद सुकरेकऱ्हाड: नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीदरम्यान कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुल भोसले यांना सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील भूमिके विषयी माध्यमांनी छेडले. तेव्हा मी काही त्या कारखान्याचा सभासद नाही असे सांगतानाच 'मला किंगमेकर व्हायची हौस नाही' असा चिमटा त्यांनी नाव न घेता ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना काढला होता. पण आता निकाल लागून विजयाचा गुलाल खाली बसला तरी देखील उदयसिंह पाटीलांनी मात्र त्यावर चुप्पी बाळगली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या चुप्पीची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे.

 सह्याद्री कारखान्याच्या निवडणूकीत तिरंगी लढतीत बाळासाहेब पाटील यांच्याच पॅनेलने बाजी मारली आहे. पण आता या निवडणुकीदरम्यान घडलेल्या किस्स्यांच्या खुमासदार चर्चा सुरू आहेत. त्यापैकी एक किस्सा म्हणजे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी एड. उदयसिंह पाटील यांना काढलेला चिमटा होय. विशेष म्हणजे एड.पाटील यांनी याबाबत चुप्पीच बाळगली आहे. खरंतर एड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व आमदार डॉ. अतुल भोसले- रेठरेकर यांच्या वडीलधाऱ्यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले होते. उंडाळकर भोसलेंना कृष्णा कारखान्याला तर भोसले उंडाळकरांना विधानसभेला मदत करत राहिले. मात्र अतुल भोसलेंनीच विधानसभेला शड्डू ठोकल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आले.आता तर त्यात अंतर वाढतच चालले आहे. 

असाच एक पैरा कराड उत्तरेत होता. तो म्हणजे पी.डी. पाटील व विलासराव पाटील- उंडाळकर यांच्यात. कराड नगरपालिका, सह्याद्री साखर कारखाना या निवडणुकांना उंडाळकरांनी मदत करायची आणि बाजार समिती, जिल्हा बँक यांना पी डी पाटलांनी मदत करायची. पण बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाल्यावर त्यांना जिल्हा बँकेत विकास सोसायटी गटातून निवडून जाण्याची आस लागली. अन गत निवडणुकीत अड. उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेंनी अचूक संधी साधत बाळासाहेब पाटलांना मदतीचा हात दिला आणि कराड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली.असो

आता डॉ. अतुल भोसले कराड दक्षिणचे आमदार आहेत तर एड. उदयसिंह पाटील हे त्यांचे विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऍड. पाटील यांनी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांची छबी त्यांच्या फ्लेक्सवर झळकत होती तर डॉ. भोसलेंनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. पण त्यांची छबी बाळासाहेब पाटील यांच्या फ्लेक्सवर होती. त्यावरून माध्यमांनी त्यांना छेडले असता त्यांनी मी कारखान्याचा सभासद नाही अन मला 'किंगमेकर होण्याची हौस नाही' असा चिमटा काढला होता. तो चर्चेचा बनला आहे. पण त्यावर ऍड. उदयसिंह पाटीलांनी अद्याप बाळगलेली चुप्पी देखील तितकीच चर्चेची ठरली आहे बरं!

कराड तालुक्याच्या राजकारणात दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचा अनेक वर्ष चांगलाच प्रभाव राहिला होता. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर जिकडे उंडाळकर तिकडे सत्ता असे समीकरण अनेक वर्ष राहिले होते. तर पाटण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा करिष्मा दिसायचा. त्यावेळी किंगमेकर म्हणून त्यांचे नाव आवर्जून घेतले जायचे. पण आता काळ बदलला आहे. म्हणून तर भोसलेंनी नाव न घेता उदयसिंह पाटलांना हा चिमटा काढला आहे. आता बघूया उंडाळकर यावर नक्की कधी आणि काय उत्तर देणार ते..

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणAtul Bhosaleअतुल भोसलेSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024