जिल्हा बँक चालवायचीय बंद पाडायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:09+5:302021-02-05T09:08:09+5:30

वावरहिरे, (ता. माण) येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या नूतनीकरणाच्या उदघाटनप्रसंगी रामराजे बोलत होते. यावेळी माजी विभागीय ...

I don't want to shut down the district bank | जिल्हा बँक चालवायचीय बंद पाडायची नाही

जिल्हा बँक चालवायचीय बंद पाडायची नाही

वावरहिरे, (ता. माण) येथे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या नूतनीकरणाच्या उदघाटनप्रसंगी रामराजे बोलत होते. यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नरेंद्र पाटील, सुभाष नरळे, संदीप मांडवे, उपनगराध्यक्ष धनाजी माने, एम.के. भोसले, बाळासाहेब सावंत, सरपंच चंद्रकांत वाघ, रमेश कदम, सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पोळ, उपाध्यक्ष सुरेश इंगळे तसेच संचालक, सरव्यवस्थापक महादेव गोंजारी उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रावर मोठे संकट घोंघावत आहे, त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत शेतकऱ्यांची पत

नसल्याने त्यांना कर्ज प्रकरणे मिळत नव्हती. यावर कै. वाघोजीराव काकांसारख्या दूरदृष्टी नेत्यांनी सहकार क्षेत्रात लक्ष घालत पतसंस्था काढल्या. बँकेत पत नसलेल्या लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून पत मिळवून देत कर्जप्रकरणे देऊन आर्थिक साहाय्य केले.’

प्रभाकर

घार्गे म्हणाले, ‘काकांच्याकडे आम्ही अनेकांना कर्ज द्या म्हणून केलेल्या शिफारशी त्वरित मान्य झाल्या; परंतु एखाद्याला कर्जप्रकरणात वसुलीला थोडी सवलत द्या, अशा शिफारशी कधीच ऐकल्या नाहीत. यावरूनच त्यांच्या कार्याची ओळख होऊन जाते. प्रभाकर देशमुख म्हणाले, काकांच्या निधनाने संस्थेत मोठी पोकळी

निर्माण झाली असली तरी ती पोकळी भरून काढण्याचे काम सुनील पोळ सर्वांना बरोबर घेऊन करताना दिसून येत आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, काकांच्यानंतर सुनील बापूंना बळ देण्याची गरज आहे. त्यांना राजेंचा राजाश्रय तर आहेच, पण सर्व सभासद ठेवीदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. सुनील पोळ यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. संचालिका नीलिमाताई पोळ यांनी स्वागत केले. सभासदांच्या वतीने वीरभद्र कावडे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक महादेव गोंजारी यांनी आभार मानले.

चौकट..

मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय...

रिझर्व्ह बँक सहकारच्या मुळावर उठली आहे. त्यांना सहकार संस्थाच मोडीतच काढायच्या आहेत. त्यामुळेच त्यांचे जाचक नियम पतसंस्था, जिल्हा बँकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठे कर्ज बुडवून गेलेल्या विजय मल्ल्याचे कर्ज रिझर्व्ह बँक भरतेय. मात्र, छोट्या कर्जधारकांना रिझर्व्ह बँक धारेवर धरतेय, हा कोणता न्याय. माझे तर असे मत आहे की ही रिझर्व्ह बँकच नष्ट करून टाकली पाहिजे.

फोटो - वावरहिरे ता.माण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी आमदार

प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी आधिकारी प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, फेडरेशन अध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

3 Attachments

Web Title: I don't want to shut down the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.