शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

“ईडी चौकशीला मी तयार, हिंमत असेल तर समोर या,” उदयनराजेंचे अजित पवार यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 22:20 IST

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या, उदयनराजेंचं थेट आव्हान.

सातारा : “एखादा माणूस काम करत असेल तर त्याला करू द्या. उगाच उठसूट खंडणीचे आरोप करू नका. मी ईडी चौकशीसाठी केव्हाही तयार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या,” असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

उपमुख्यमंत्री पवार पाच दिवसांपूर्वी माण तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकप्रतिनधींमुळे सातारा एमआडीसीचा विकास खुंटला’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खा. उदयनराजे यांनी शुक्रवारी आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, “पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात एमआयडीसीला परवानगी दिली जात होती. त्यावेळी ज्यांच्याकडे सत्ता होती. ज्यांच्याकडे मंत्रिपद होते, त्यांनी आपली जबाबदारी का पार पाडली नाही? त्यावेळी सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी का विकसित झाली नाही. त्यावेळच्या तत्कालीन आमदार, खासदारांनी एमआयडीसीकडे लक्ष का दिले नाही?” १९७४ रोजी सातारा आणि नगरची एमआयडीसी विकसित झाली. कालांतराने नगरची एमआयडीसी विकसित झाली. मग साताऱ्याची का नाही? हा प्रश्न जसा जनतेला पडतो, तसा तो मलाही पडतो. उगाच एकमेकांवर जबाबदारी झटकू नका. सातारा एमआयडीसीची दयनीय अवस्था का व कोणामुळे झाली हे मी सांगण्याची गरज नाही. एलएनटी, इंडियन सिमिलेन्स पाईप, डॉक्टर बेग या कंपन्या साताऱ्यात येणार होत्या. त्या दुसरीकडे कशा गेल्या? एमआयडीसीचा ले आऊट जेव्हा तयार होतो तेव्हा पेट्रोल पंप, कर्मचाऱ्यांची वसाहत आदी कामांसाठी जागा दिली जाते. असे असताना एमआयडीसीतील प्लॉट कोणी विकत घेतले हे बघा. अधिकाऱ्यांना हाताशी धरायचे, शासनाची परवागनी आणायची, मग घरे बांधायची, आजवर हेच चालत आल्याचा आरोपही उदयनराजे यांनी केला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय