शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेसह दोन मुलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:21 IST

या घटनेने परिसरात उडाली खळबळ

कोरेगाव : तालुक्यातील शिरंबे येथे ऊसतोडणी कामगार दत्ता नारायण नामदास याने सोबत राहणाऱ्या योगीता नावाच्या महिलेचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना दुचाकीवर बसवून जवळच्या शेतात नेऊन विहिरीत ढकलून दिले. ही घटना बुधवारी (दि.१५) रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्ता नामदास याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते.रहिमतपूर पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्ता नारायण नामदास हा उस्मानाबाद जिल्ह्यातील राजे बोरगाव येथील रहिवासी आहे. गळीत हंगाम संपल्यानंतर ऊस तोडणाऱ्या टोळीबरोबर मूळ गावी गेला नाही. तो वेलंग शिरंबे येथे राजेंद्र सपकाळ यांच्या घरामध्ये खोली भाड्याने घेऊन योगीता आणि मुले समीर व तनू यांच्यासमवेत राहत होता. योगीता ही त्याची पत्नी नाही; पण दोघे एकमेकांसोबत राहात होते. योगीताचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते.बुधवारी रात्री त्याने घरातच योगीता हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने मुले समीर व तनू यांना बाहेर जायचे आहे, असा बहाणा करून उठवले व दुचाकीवरून मळ्यातील एका विहिरीवर नेले. अंधारात दोघांना विहिरीत ढकलून दिले. या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोकवस्तीपासून विहीर लांब असल्याने कोणालाही या हत्याकांडाचा सुगावा लागला नाही.हा खून केल्यानंतर तो आपल्या मूळ गावी निघून गेला होता. गुरुवार, दि. १६ जून रोजी सायंकाळी खोलीतून वास येऊ लागल्याने सपकाळ यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलीसांना कळविले. पोलिसांनी दत्ता नामदास याच्याबाबतीत चौकशी केली. मात्र, तो दोन दिवस गावात नसल्याचे समजले. त्यानंतर तो मूळ गावी गेल्याच्या संशयावरून माहिती घेतली. त्याला अकलूज येथून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देत सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड व उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपासकामी सूचना केल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी