कऱ्हाडात युवकांची तुफान दगडफेक

By Admin | Updated: February 13, 2017 03:17 IST2017-02-13T03:17:37+5:302017-02-13T03:17:37+5:30

गावातील युवक व हॉटेलमधील वेटर यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. युवकांनी एकमेकांच्या दिशेने तुफान दगडफेक केली.

Hurricanes of youth in Karhad | कऱ्हाडात युवकांची तुफान दगडफेक

कऱ्हाडात युवकांची तुफान दगडफेक

कऱ्हाड : गावातील युवक व हॉटेलमधील वेटर यांच्यात झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. युवकांनी एकमेकांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. काचेच्या बाटल्याही भिरकावल्या. हाणामारीत पाच जण जखमी झाले असून, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारुंजीफाटा-कऱ्हाड येथील हॉटेल शिवराजसमोर रविवारी दुपारी ही घटना घडली. दगडफेकीत नुकसान झालेली वाहने पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
हॉटेल शिवराजचे काही वेटर शनिवारी सायंकाळी वारुंजी फाट्यावर आले होते. तेव्हा वारुंजीतील काही युवकांशी त्यांचा वाद झाला होता. ग्रामस्थांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला होता. मात्र रविवारी दुपारी त्यांच्यात मारामारी झाली. तीस ते चाळीस युवकांचा जमाव हॉटेल परिसरात जमला. त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. दगड व बाटल्यांच्या फेकाफेकीनंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. (प्रतिनिधी)

Web Title: Hurricanes of youth in Karhad