महाबळेश्वरात पर्यटकांची चक्री वादळामुळं तारांबळ

By Admin | Updated: February 26, 2017 00:33 IST2017-02-26T00:33:48+5:302017-02-26T00:33:48+5:30

पाच मिनिटं घोंगावलं : अनेकांकडून मोबाईलमध्ये कैद

Hurricanes of Mahabaleshwar storm | महाबळेश्वरात पर्यटकांची चक्री वादळामुळं तारांबळ

महाबळेश्वरात पर्यटकांची चक्री वादळामुळं तारांबळ

महाबळेश्वर : जगभरातील पर्यटकांच्या मनपसंतीचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरतील वेण्णा लेक परिसरात शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या चक्री वादळाने सर्वांचीच दाणादाण उडाली. सावली व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी उभ्या केलेल्या छत्र्या चक्री वादळामुळे उडून गेल्या.
वीक एण्ड असल्याने वेण्णा लेक येथे पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक नौकाविहार, घोडेसवारीचा आनंद घेत असतानच वेण्णा लेकच्या वाहनतळावरच अकस्मात चक्रीवादळ निर्माण झाले. मैदानातले हे चक्रीवादळ सुमारे पाच मिनिटे घुमत होते.
या दरम्यान, रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या-मोठ्या स्ट्रॉल विक्रेत्यांच्या छत्र्या उडून गेल्या. अनेकांची तारांबळ उडाली. लहान मुले महिला धावत दूर गेल्या. तर काही पर्यटक कौतुकानं हे चक्रीवादळ गाड्यांमध्ये बसून पाहत होते. हे चक्रीवादळ पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व महाबळेश्वर बाजार पेठेकडे निघालेले पर्यटक थांबले. या चक्री वादळाचे मोबाईलमधून शूटिंग काढण्यासाठीही जणू स्पर्धा लागली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Hurricanes of Mahabaleshwar storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.