शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भुकेल्या पोटाला मिळतोय हक्काचा घास ! साताऱ्यातील सर्व धर्मीयांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:21 IST

अनेक युवक आणि काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत आहेत. तसेच ते स्वखर्चातून व मिळालेल्या मदतीतून चांगला उपक्रम राबवत आहेत. गेल्या ४६ दिवसांपासून सर्वजण दररोज अन्नाची ४५० ते ५०० पाकिटे तयार करून वाटप करत आहेत.

ठळक मुद्दे जागेवर पोहोचून अन्नदान : ४६ दिवसांत २० हजार अन्न पाकिटांचे वाटप

नितीन काळेलसातारा : उपेक्षित, गरीब, आजारी व्यक्ती, वृद्ध, दिव्यांग बांधवांसाठी साताºयातील सर्व धर्मीय नागरिकांचे काम सुरू आहे. याअंतर्गत गेल्या ४६ दिवसांपासून दररोज सुमारे ४५० अन्न पाकिटांचे वाटप जागेवर जाऊन करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २० हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे भुकेल्या पोटाला हक्काचा घास मिळत आहे.

कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात संचारबंदी आहे. यामुळे अनेक व्यवसायांवर, मजुरी करणाऱ्यांवर गंडांतर आलेले आहे. अशामधील गरीब, गरजू, वंचित, वृद्ध, दिव्यांगांना मदत करण्याचे काम अनेकांकडून सुरू आहे. अशाचप्रकारे साता-यामधील गुरुवार पेठेतील दिवंगत अ‍ॅड. अख्तरनवाज रंगलाल कलाल यांच्या निवासस्थानी अनेक युवक आणि काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत आहेत. तसेच ते स्वखर्चातून व मिळालेल्या मदतीतून चांगला उपक्रम राबवत आहेत. गेल्या ४६ दिवसांपासून सर्वजण दररोज अन्नाची ४५० ते ५०० पाकिटे तयार करून वाटप करत आहेत.

विशेष म्हणजे गरजू, आजारी, निराधार व्यक्ती आहेत तेथे जाऊन पाकिटे देण्यात येतात. त्यासाठी स्वतंत्रपणे अनेकजण जातात. सर्वांनीच हे काम वाटून घेतले आहे. त्यासाठी पदरमोड ही करतात.

विशेष म्हणजे या ग्रुपकडून शासनाच्या सर्व अटी, नियम, स्वच्छतेचे पालन करून ही सेवा बजावली जात आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत ही अन्नदानाची सेवा आम्ही सुरूच ठेवणार आहोत. तसेच येईल त्या संकटांशी सामना करीत आम्ही यातून मार्ग काढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

यामध्ये मुफ्ती अब्दुल हमीद, आफताब कलाल, साहिल बागवान, सिद्धार्थ गुजर, सलीम बागवान, रोहित लाहोटी, नगरसेवक अल्लाउद्दीन शेख, मोहसीन कलाल, भाऊ राजमाने, अ‍ॅड. रमिज कलाल, मन्सूर शेख, इन्नुस खान, इर्षाद बागवान, तौफिक बागवान, नादीर पालकर यांच्यासह गुरुवार पेठतील नागरिक एकत्र येऊन हा अत्यंत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवत आहेत. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यापासून आम्ही गरीब, गरजू आणि दिव्यांगांना अन्न पाकीटचे वाटप करत आहोत. यापुढेही सामाजिक भावनेतून अन्नदानाचे काम सुरूच राहणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी मदत करत आहेत. तसेच प्रशासनास लागेल तेव्हा मदत करण्यास आम्ही तयार आहोत.- आफताब कलाल, सातारा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस