राज्यपालांच्या निवासस्थानी धनगर समाज करणार उपोषण

By Admin | Updated: July 22, 2014 22:12 IST2014-07-22T21:58:14+5:302014-07-22T22:12:18+5:30

मुख्य संघटक जयप्रकाश हुलवान

The hunger strike by the Dhangar community at the Governor's residence | राज्यपालांच्या निवासस्थानी धनगर समाज करणार उपोषण

राज्यपालांच्या निवासस्थानी धनगर समाज करणार उपोषण

सातारा : धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दि. ४ आॅगस्टपासून राज्यपालांच्या शासकीय निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती महराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे मुख्य संघटक जयप्रकाश हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
धनगर समाजाला आरक्षण देताना ‘र’ चा ‘ड’ झाल्याने हा समाज कित्येक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. धनगर आणि धनगड ही एकच जात असलेला अहवाल ६५ वर्षांपासून शासनाने नाकारलेला आहे.
राज्यघटनेत कलम ३४२ खालील महाराष्ट्र अनुसूचित जमातीतील यादीत ओरान धनगर अशी नोंद आहे. हिंदी भाषेत धनगड व मराठी भाषेत धनगर हे दोन्ही शब्द एकाअर्थी आहेत. उदाहरणार्थ मराठीत गुरगाव तर हिंदीत गुडगाव, मराठीत एकर तर हिंदीत एक्कड म्हणतात. त्याचप्रमाणे मराठीत धनगर तर हिंदीत धनगड म्हणतात. त्यामुळे धनगर आणि धनगड ही एकच जात आहे.
बिहार, हरियाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, आंध्र या राज्यांत धनगर जातीचा अनुसूचित जमातीत समावेश केला आहे. केंद्र शासनाच्या जनजातीय कार्यमंत्रालयाने २००७ ते २००९ अहवालात महाराष्ट्रातील अनुसूचित जनजमातीच्या यादीतही ओरान धनगर अशीच नोंद आहे.
शासनाने राजपत्र १९ मार्च २००१ मध्ये संविधान अनुसूचित जमाती आदेश १९५० परिशिष्ठातील भाग ९ मध्ये धनगर समाज हा अनुसूचित जातीय जमातीत आहे, असे नोंद करण्यात आले आहे.जोपर्यंत महाराष्ट्र शासन धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असेही हुलवान यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The hunger strike by the Dhangar community at the Governor's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.