गणेशोत्सवात पाहायला मिळणार माणुसकीचा देखावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:02 IST2019-08-18T23:02:45+5:302019-08-18T23:02:59+5:30
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ...

गणेशोत्सवात पाहायला मिळणार माणुसकीचा देखावा !
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं आहे. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं मान्यवरांनी ठरवलं आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात संवेदनशील माणुसकीच्या खºया देखाव्याचे दर्शन घडणार आहे.
आपले सख्खे शेजारी असणाºया सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने हैदोस घातला आणि अगदी सगळं होत्याचं नव्हतं केलं. या परिस्थितीतही पूरग्रस्त उभं राहत असताना त्यांना बळ देण्याचं आवाहन ‘लोकमत’ने गणेशोत्सव मंडळांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत साताºयातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी यंदा देखावामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं निश्चित केलं आहे. देखाव्यात होणाºया अतिरिक्त खर्च पूरग्रस्तांच्या उभारणीसाठी देण्याचंही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितलं आहे. संकटकाळात मदत करण्याच्या सातारकरांच्या या वृत्तीमुळे सांगली कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना पुन्हा नव्यानं उभं राहण्याचं बळ मिळणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांसह स्वंयसेवी संस्थांचाही पुढाकार अपेक्षित आहे.
यांनी ठरवलं यंदा नो जिवंत देखावा...
साताºयातील बाल विकास गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ, राजकमल गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, श्री फुटका गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, गजराज गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, खणआळी गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा, समर्थ गणेशोत्सव मंडळ, मंगळवार पेठ समर्थ मंदिर आणि मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची एकी हवी!
नैसर्गिक आपत्तीमुळे सातारा शहरातील जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळांनी हे देखावे रद्द करून त्याचा निधी पूरग्रस्तांकडे देण्याचं निश्चित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उत्सव काळात सातारकरांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन पूरग्रस्तांना खंबीर मदत करण्याचं ठरवलं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची एकी हवी. इच्छुक मंडळांनी ‘लोकमत’शी संपर्क साधावा.