उमेदवार शोधताना लागणार कस!

By Admin | Updated: January 9, 2017 22:31 IST2017-01-09T22:31:18+5:302017-01-09T22:31:18+5:30

माण तालुका : खुले आरक्षण असतानाही अनेकजणांची गटावर नजर

How to Find the Candidates! | उमेदवार शोधताना लागणार कस!

उमेदवार शोधताना लागणार कस!


नवनाथ जगदाळे ल्ल दहिवडी
गोंदवले जिल्हा परिषद गटामध्ये खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असून, उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे. या गटात गोंदवलेसह पळशी हे गाव मोठे असल्याने गोंदवले किंवा पळशी मधीलच जिल्हा परिषदेसाठी उमेदवार राहत असतो. या गटात ओबीसी समाज अधिक असून, आरक्षण खुले असले तरी अनेकांच्या नजरा या गटावर राहणार आहेत.
माण तालुक्यातील या गटात मागील निवडणुकीत यशवंतराव माने महाराज यांचे सुपुत्र बाळासाहेब माने यांचा अनिल देसाई यांनी पराभव केला होता. त्यामुळे देसाई हे कुकुडवाड गटात राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास व पक्षाने आग्रह केल्यास गोंदवले गटात कुटुंबातील एखाद्या महिलेला उतरवू शकतात. मात्र, प्रत्येक वेळीच बाहेरील उमेदवाराला गट स्वीकारेलच असे नाही. तरीही इच्छुक पुढे येत नसल्याने देसाई यांना लॉटरी लागू शकते. राष्ट्रवादीतून पूर्वी लोधवडे येथील छायादेवी चोपडे यांनी या गटाचे नेतृत्व केले आहे. कॉँग्रेसमधून गोंदवले खुर्दचे अजित पोळ यांच्या घरातूनच उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे. मतदारसंघात अनुभवी व ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, गोंदवलेचे माजी सरपंच विष्णुपंत कट्टे, अंगराज कट्टे अशी अनेक नावे ऐनवेळी आपला दावा करू शकतात.
बाळासाहेब खाडे व डॉ. राजेंद्र खाडे हे पळशीचे असल्याने भाजपची ताकद गटात आहे. विशेषत: वंजारी समाजाची ताकद या गटात नेहमी निर्णायक ठरली आहे. भाजपमधून गोंदवलेचे अरुण कट्टे हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक असून, दहिवडीच्या माजी सरपंच अर्चना महाडिक यांचेही माहेर गोंदवले असल्याने पक्षाने तिकीट दिल्यास त्या उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे समजते. दहिवडी नगरपंचायतीला संधी असतानाही त्यांनी उमेदवारी न लढवणे पसंत केले होते. वेळ प्रसंगी धामणीचे सरपंच सदाशिव खाडे यांच्या पत्नीही उमेदवारी करू शकतात.

Web Title: How to Find the Candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.