शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या गावी घरांना गवताच्या झडपा, घरांच्या भिंतीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; कास परिसरात लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:30 IST

कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो.

सागर चव्हाणपेट्री : कास परिसरातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील गावांगावात पारंपरिक पध्दतीने घरांच्या भिंतीचे संरक्षण होण्यासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बहुतांशी गावांतील आवश्यक घरांना झडपी बांधल्या आहेत. पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धूके, जास्त थंडी पाहता घरातील वातावरण उबदार राहण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधून पर्यावरणपुरक उपाययोजना केली जात आहे.

कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. मनुष्य आपलं संरक्षण करतो तसंच गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतो. घरांच्या भिंतीना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधतात. बहुतांशीजणांनी झडप्या बांधून घरांच्या भिंतीला संरक्षणात्मक उपाय केला असून काही ठिकाणी झडप्या बांधण्याचे काम वेगात सुरू आहे.

मुसळधार पावसाच्या पाण्याचा तडाखा ज्या दिशेने बसतो अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधतात. साधारण जूनच्या सुरूवातीस कामाला सुरूवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभी करून मेसाची फोकाटी आडवी-उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवतात विशिष्ट पध्दतीने झडपी बांधतात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतीचे पावसाच्या तडाख्यापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधली जातात. पावसाळयानंतर कुजलेले गवत तरव्याला खत म्हणुन वापरतात.दुर्गम, डोंगरमाथ्यावर पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसतो. भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत आणण्याचे काम झडपीमुळे होते. घराच्या भिंती पावसाच्या तडाख्याने भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेतकरी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार आपापल्या घरांच्या भिंतींना बांधतात. झडपी बांधण्यासाठी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस