पळशिवणे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने घरांचे पत्रे उडाले

By Admin | Updated: May 3, 2014 14:36 IST2014-05-03T13:23:38+5:302014-05-03T14:36:29+5:30

पळशिवणे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने घरांवरील सिमेंट पत्रे उडाले. या वादळी पावसाने अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

House letters were flown in the rainy season at Palshivaya | पळशिवणे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने घरांचे पत्रे उडाले

पळशिवणे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने घरांचे पत्रे उडाले

वाघापूर : पळशिवणे (ता. भुदरगड) येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने घरांवरील सिमेंट पत्रे उडाले. या वादळी पावसाने अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने प्रभाकर पांडुरंग खोळांबे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे पूर्णत: ॲँगलसह उडून गेले आहेत. तसेच हौसाबाई कांबळे व प्रकाश सखाराम पोवार यांच्या घरावरीलही सिमेंट पत्रे उडून गेले आहेत. संतोष पोवार व हैबती पोवार यांच्या घराशेजारील शेडवरील सिमेंट पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी आंबा पिकांचेही नुकसान झाले आहे.
या अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामदैवत जोतिबा रस्त्यावरील विद्युत खांब वाकून तारा तुटलेल्या आहेत. विद्युत तारा तुटल्याने गेले दोन दिवस विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना गावाबाहेरील आडावरून पाणी आणावे लागत आहे.

Web Title: House letters were flown in the rainy season at Palshivaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.