शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘कºहाड’कर ‘जनता’ बाबांच्या सत्कारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:03 IST

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील एका वारकºयाला पंढरपूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या रुपाने चंद्रभागेतीरी काम करण्याची संधी मिळालीय. पदभार स्वीकारल्यापासून कºहाड तालुक्यात त्यांचे सत्कार सोहळे सुरू आहेत; पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली काम करणाºया येथील एका बँकेच्या दोन विद्यमान संचालकांनीच भाजपचे नेते असलेल्या अतुल भोसलेंचे सत्कार कार्यक्रम आयोजित ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील एका वारकºयाला पंढरपूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदाच्या रुपाने चंद्रभागेतीरी काम करण्याची संधी मिळालीय. पदभार स्वीकारल्यापासून कºहाड तालुक्यात त्यांचे सत्कार सोहळे सुरू आहेत; पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली काम करणाºया येथील एका बँकेच्या दोन विद्यमान संचालकांनीच भाजपचे नेते असलेल्या अतुल भोसलेंचे सत्कार कार्यक्रम आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या नाहीत तर नवलच.खरंतर यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कºहाडला राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. याच पंढरीत राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे अनेक युवा नेते आहेत. पैकी एक म्हणजे भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले. काँगे्रसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपच्या वतीने लढण्याचे शिवधनुष्य डॉ. भोसलेंनी ऐनवेळी उचलले. पराभवाने खचून न जाता ते पक्षकार्यासाठी प्रयत्न करीत राहिले. त्याचीच पोचपावती म्हणून अगोदर पक्षाचे प्रदेश चिटणीसपद त्यानंतर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले. त्यामुळे भोसले समर्थकांच्या आनंदाला पारावार उरलानाही.महाराष्ट्रातील लाखो वारकºयांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाल्याने डॉ. अतुल भोसले यांचा अपवाद वगळता दररोज कुठे ना कुठे सत्कार कार्यक्रम होत आहेत. कºहाड दक्षिणेत तर त्यांचे कार्यकर्ते ‘एकसे बढकर एक’ असे देखणे कार्यक्रम करीत असून, माझ्या हातून पंढरपूरात नक्कीच सत्कार्य होईल, असा विश्वास अतुल भोसले सत्काराला उत्तर देताना देत आहेत.या सगळ्या सत्कार सोहळ्यांत दोन सत्कार समारंभांची तालुक्यात मोठी चर्चा आहे.ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली काम करणाºया कºहाड जनता सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीपभाऊ चव्हाण यांनी कºहाड येथे घेतलेल्या डॉ. अतुल भोसले यांच्या सत्काराची. तर दुसरे संचालक बबनराव शिंदे यांच्या हस्ते विंग येथे झालेल्या भोसले यांच्या सत्काराची.गत विधानसभा निवडणुकीत जनता उद्योग समूहाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. आता त्याच बँकेचे संचालक भाजपच्या बाबांचा सत्कार करताहेत म्हटल्यावर चर्चा तर होणारच.डॉक्टर कोणता इलाज करणार?पंढरपूर विकासातील अनेक आजारांवर इलाज करण्यासाठी देवस्थान विकासाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे डॉ. भोसले यांनी यापूर्वीच जाहीर केलयं; पण फडणवीसांनी केलेल्या निवडीवर काही ‘फड’करी नाराज आहेत. त्यात काही ‘कºहाडकरां’चाही समावेश आहे. या नाराजीवर हे कºहाडकर डॉक्टर कोणता इलाज काढणार, हे पाहावे लागेल.मठाधिपतींनीही केला सत्कारकºहाडच्या डॉ. अतुल भोसले यांच्या पंढरपूर देवस्थान समिती अध्यक्षपदाच्या निवडीला दस्तुरखुद्द वारकरी संघटनेचे बंडा तात्या कºहाडकरांनी कडाडून विरोध केलाय. सध्या ते शाब्दिक ‘वार’ करीत आहेत. मात्र, दुसरीकडे कºहाडकरांचे श्रद्धास्थान असणाºया कºहाडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा कºहाडकर यांच्या हस्ते डॉ. भोसले यांचा अनेक ठिकाणी सत्कार होत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द वारकरी मंडळी बुचकळ्यात पडल्याचे पाहायला मिळत आहेत.