सुपनेत परिचारिकांच्या सेवेचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:39 IST2021-05-14T04:39:02+5:302021-05-14T04:39:02+5:30

यावेळी हिंदू एकताचे पाटण तालुकाध्यक्ष तुषार ऊर्फ गणेश पाटील, डॉ. सुनीता खरात, रमेश पाटील, परिचारिका भाग्यश्री सूर्यवंशी, शोभा यादव, ...

Honoring the service of nurses in Supan | सुपनेत परिचारिकांच्या सेवेचा सन्मान

सुपनेत परिचारिकांच्या सेवेचा सन्मान

यावेळी हिंदू एकताचे पाटण तालुकाध्यक्ष तुषार ऊर्फ गणेश पाटील, डॉ. सुनीता खरात, रमेश पाटील, परिचारिका भाग्यश्री सूर्यवंशी, शोभा यादव, अपर्णा कोळी, सुवर्णा गुजर, नीलम दीपक पाटील, सुप्रिया अविनाश जाधव, उज्ज्वला विशाल सूर्यवंशी, अजित जाधव, विकी कांबळे, अविनाश जाधव, दीपक पाटील, विशाल सूर्यवंशी उपस्थित होते.

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिचारिकांचा सत्कार करून त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका अहोरात्र सेवा करत असतात. सध्याच्या कोरोनोसारख्या महाभयंकर संकटात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊच शकत नाही, असे मत यावेळी गणेश पाटील यांनी व्यक्त केले.

फोटो : १४केआरडी०६

कॅप्शन : सुपने (ता. कऱ्हाड) येथे हिंदू एकता आंदोलनचे पाटण तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Honoring the service of nurses in Supan