सुर्ली येथे कष्टकरी महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:38 IST2021-03-16T04:38:24+5:302021-03-16T04:38:24+5:30

नुकताच महिला दिन संपन्न झाला. त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच दत्तात्रय वेताळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्रीकांत अग्रोटेकचे ...

Honoring hardworking women at Surli | सुर्ली येथे कष्टकरी महिलांचा सन्मान

सुर्ली येथे कष्टकरी महिलांचा सन्मान

नुकताच महिला दिन संपन्न झाला. त्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच दत्तात्रय वेताळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्रीकांत अग्रोटेकचे अध्यक्ष विक्रम वेताळ, उपसरपंच राजश्री वेताळ, सलीम मुजावर, विजय चव्हाण, पद्मिनी माने, रत्नमाला वेताळ व प्रवीण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजातील कष्टकरी महिलांचाही सन्मान व्हावा, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उन्हातान्हात काबाडकष्ट करणाऱ्या या महिलांना उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना सनकोटचे वाटप करण्यात आले तसेच शेतीकामासाठी उपयोगी असणारे खुरपे ही सर्व महिलांना प्रदान करण्यात आले. या अनोख्या सन्मानाने ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

कार्यक्रमास शोभा कळंबे, रत्नमाला वेताळ, अमित फुके, अमोल भोगे, मंगेश वेताळ, गणेश भोसले, गौरव करांडे तसेच रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष सलीम मुजावर यांची उपस्थिती होती. कृष्णत मदने यांनी प्रास्ताविक केले.

फोटो :सुर्ली येथे कष्टकरी महिलांचा सन्मान करताना मान्यवर.

Web Title: Honoring hardworking women at Surli