कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:54+5:302021-08-25T04:43:54+5:30
शहरात पार्किंगची गैरसोय सातारा : शहरात ठिकठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाहन पार्किंग करताना गैरसोय होत आहे. ...

कोरोना योद्ध्यांचा सन्मान
शहरात पार्किंगची गैरसोय
सातारा : शहरात ठिकठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाहन पार्किंग करताना गैरसोय होत आहे. सातारा शहर व परिसरात ठरावीक ठिकाणी रिक्षा स्टॉप करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्किंगसाठी जागा मिळत नाही. बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बस सुरू करण्याची मागणी
सातारा : सातारा सज्जनगड बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या कोरोना प्रसाराच्या भीतीने सज्जनगडावरील मंदिरे बंद आहेत. मात्र, अनेक निसर्ग पर्यटक गडाकडे येतात. गडावर अनेक कुटुंबे, सज्जनगड मंदिराशी संबंधित राहतात. सज्जनगड फाट्यापासून गडावर चालत जावे लागते. त्याचा त्रास रूग्ण, वृद्धांना जास्त होतो. सातारा आगाराने तातडीने सातारा सज्जनगड बस सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
साहित्याचे वाटप
सातारा : पाटण तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने चाफळ (ता. पाटण) परिसरातील अतिवृष्टी व भूस्खलनाच्या बाधित गावांतील शाळेतील सुमारे ५० विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने हे शैक्षणिक साहित्य देण्यात आले असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी दिली.
कृषिकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सातारा : ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अदिती जाधव हिने काशीळ ता. सातारा येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, खते, बी-बियाणे, माती परीक्षण, सेंद्रिय शेती, औषध फवारणी या विषयांवर मार्गदर्शन केले.
............