शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:16 PM

कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यांपासून या योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन मिळालेली नाही.

ठळक मुद्देकोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपडपेन्शनधारक विधवा, परितक्त्या, अपंग, ज्येष्ठांना दाखल्यांची सक्ती

सागर गुजरसातारा : कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यांपासून या योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन मिळालेली नाही.केंद्र व राज्य सरकारकडून समाजातील विधवा, निराधार, परितक्त्या, वृध्द व दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या पेंन्शनच्या लाभार्थ्यांना बँकांनी विविध जाचक अटी लावल्या आहेत. या अटी रद्द करुन चालू व मागील दोन महिन्यांची पेन्शन बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग, विधवा, वृध्द लोक उत्पन्नाच्या व हयातीच्या दाखल्यासाठी तहसीलदार, तलाठी, महा-ई-सेवा या कार्यालयांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. या अबाल वृध्दांचे वय ६५ वर्षांच्या वर आहे. तसेच दिव्यांग बांधवांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांना पेन्शन मिळविण्यासाठी जीव टांगणीला लावायला लागतो आहे.सातारा जिल्ह्यात दिवसागणिक ७०० ते १००० च्या घरात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. वंचित, निराधार घटकांना मदत करण्याऐवजी त्यांना जीव मुठीत घेऊन शासनाच्या जाचक अटींची अंमलबजावणी करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे, ही निंदणीय व खेदाची बाब आहे. या पेन्शनवर अनेकांचा उदरनिर्वाह चालत आहे. तसेच प्रशासनाने जाचक अटी लादल्याने हा घटक वंचित राहत आहे.अशा पेन्शनधारकांना कोणतेही निर्बंध न लादता त्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमा लाभार्थ्यांना तत्काळ देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार व बँकांना सूचना देण्याचे आदेश द्यावेत. तसेच बँकांनी पेन्शनधारकांना मागील वषार्चे उत्पन्न, हयातीचे दाखले सादर केल्याशिवाय पेन्शन दिली जाणार नाही. अशी अट रद्द करावी.

महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचे मासिक वेतन थांबले नाही. शासकीय अधिकाऱ्यांचा पगार थांबलेला नाही. तो महिन्याकाठी बँक खात्यावर जमा होतोय. पण दिव्यांग निराधार, विधवा व वंचित घटकांना त्यांच्या हक्काची पेंन्शन गेल्या दोन महिन्यांपासून जमा झालेली नाही. प्रशासनाने यात लक्ष घालावे.- अमोल कारंडे,जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना

सावळागोंधळ कसा दूर करायचा?कोरोना महामारीच्या काळात ६0 वर्षांवरील व्यक्ती तसेच आजारी लोकांनी घरात बसूनच राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने वारंवार केले जात आहे; परंतु प्रशासकीय नियमांचे कागदी घोडे नाचवणाºयांमुळे गरजवंतांना रस्त्यावर यावे लागत आहे. प्रशासनाचा सुरु असलेला सावळागोंधळ निराधारांच्या जीवाशी खेळ करणारा ठरताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.कार्यालयात नको...महाईसेवा केंद्रात जावा..शासकीय कार्यालयांत गर्दी करु नका, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; परंतु हयातीचे तसेच उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी लाभार्थ्यांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरत नाही. शासकीय कार्यालयात न येता महाईसेवा केंद्रात जाण्याचा उफराटा सल्ला देखील दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र