घरात जेव्हा नोटीस धडकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:01+5:302021-02-05T09:20:01+5:30

वास्तविक ई चलनचा दंड केल्यानंतर १५ दिवसांच्या आत हा दंड भरणे सक्तीचे आहे. मात्र, अनेक वाहन चालक वर्षानुवर्षे ...

At home when the notice hits ... | घरात जेव्हा नोटीस धडकते...

घरात जेव्हा नोटीस धडकते...

वास्तविक ई चलनचा दंड केल्यानंतर १५ दिवसांच्या आत हा दंड भरणे सक्तीचे आहे. मात्र, अनेक वाहन चालक वर्षानुवर्षे दंड भरत नाहीत. अशा वाहन चालकांना जिल्हा वाहतूक शाखेतर्फे दंड भरण्याच्या नोटीस बजावण्यात येतात. जेव्हा ही नोटीस घरात धडकते, तेव्हा मग वाहन चालकांच्या पायाखालची वाळू सरकते. नाईलाजस्तव का होईना त्यांना थकीत दंड भरावा लागतो.

चौकट : एक नेशन एक चलन..

ई चलनाची सुविधा एक नेशन एक चलन अशी आहे. देशात कुठेही दंड झालेली गाडी गेली असेल तर तेथे पोलिसांना दंड आकारून घेण्याची मुभा असते. मात्र, सोयीनुसार जिल्हा पोलीस आपापल्या जिल्ह्यातील वाहनांचा दंड वसूल करत असतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील गाडी समजा सातारा जिल्ह्यात पकडली, तर सांगली पोलीस त्या गाडीचा दंड वसूल करण्यासाठी नोटीस बजाऊ शकतात. अशी सुविधा ई चलनामध्ये असल्यामुळे अनपेड दंडाची रक्कम वाढत आहे.

कोट : महामार्गावरून धावणारी अनेक वाहने ही परराज्यातील असतात. अशा वाहनांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो. मात्र, अनेक वाहन चालक तत्काळ दंड भरत नाहीत. अशा अनपेड दंडाची रकम तीन कोटींच्या घरात आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, भुर्इंज टॅप

Web Title: At home when the notice hits ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.