शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:07 IST

सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरलेला माल विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देसाताऱ्यात घरफोडी करणारी टोळी गजाआडस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एलसीडीसह सोने हस्तगत

सातारा : शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून चोरलेला माल विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडी व चोरीतील एक एलसीडी व दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रवी निलकंठ घाडगे (वय २५), सागर नागराज गोसावी (वय २२, दोघे रा. सैदापूर), भिवा उर्फ आकाश दत्तात्रय दणाणे (वय १९, रा. तामजाईनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मंगळवारी दुपारी शहरात गस्त घालत होते. दरम्यान, मोळाचा ओढा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना काही तरूण परिसरातून संशयास्पद फिरत असल्याचे दिसले.

साबळे यांनी संबंधितांना थांबवून विचारपूस केली मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. मोळाचा ओढा, तामजाईनगर, मनिषा कॉलनी, आंबेदरे रोड परिसरात घरफोडी केल्याचे चौकशीदरम्यान कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेला एक एलसीडी व दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या. संशयितांना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, जोतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, नितीन भोसले, गणेश कापरे, वैभव सावंत, धीरज महाडिक, केतन शिंदे, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस