हॉलीवूडही भुलले यवतेश्वर पठाराला

By Admin | Updated: May 17, 2015 01:24 IST2015-05-17T01:24:20+5:302015-05-17T01:24:20+5:30

चंदेरी दुनियेत सातारची सॉलीवूड ओळख : इंग्रजी ‘उमेरिका’ चित्रपटाचे पठारावर चित्रीकरण

Hollywood too Bhulele Yataveshwar Platara | हॉलीवूडही भुलले यवतेश्वर पठाराला

हॉलीवूडही भुलले यवतेश्वर पठाराला

सागर चव्हाण / पेट्री
बॉलीवूड, टॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या निसर्गसौंदर्यानं भुरळ घालणारा सातारा आता हॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. जागतिक वारसास्थळाच्या यादीत कास पुष्प पठाराचे नाव नोंदविले गेल्याने कासची ओळख जगभर पसरली आहेच परंतु आता हॉलीवूडनेही येथील डोंगरदऱ्या, निसर्गसौंदर्यानं नटलेल्या परिसराचे वेगळेपण ओळखून ‘उमेरिका’ या इंग्रजी चित्रपटाचे चित्रीकरण येथील यवतेश्वर पठारावर केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडच्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी बनविलेल्या या चित्रपटातील कलाकार मात्र भारतीय आहेत.
चित्रपटसृष्टीत सॉलीवूड नावाने ओळखला जाणारा सातारा जिल्हा अनेक चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर झळकत आहे. मराठी, हिंदी, तमिळ, भोजपुरी अशा विविध चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक साताऱ्याला पसंती देत आहेत.
सातारी निसर्गसौंदर्य, येथील लोकेशन्स चित्रपटनिर्मितीला योग्य असल्यामुळे आजपर्यंत
अनेक चित्रपटांचे चित्रीकरण संगममाहुली, कास, बामणोली, तसेच वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, माण आदी भागात झाले आहे, अशी माहिती निर्मितीप्रमुख नटराज शिंदे व निर्मिती व्यवस्थापक हेमंत गिरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
टीव्ही मालिकांचेही चित्रीकरण
साताऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील परिसरात आजपर्यंत अनेक चित्रपटांबरोबरच टीव्हीवरील मालिकांचेही चित्रीकरण झाले आहे. नुकतेच कास तलाव परिसरात ‘सीआडी’ मालिकेचे चित्रीकरण झाले.

Web Title: Hollywood too Bhulele Yataveshwar Platara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.