शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ऐतिहासिक प्रतापगडावर अवतरला शिवकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:39 PM

महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजेरी लावली.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सांगली जिल्ह्याचे ...

महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजेरी लावली.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सांगली जिल्ह्याचे आयकर विभागाचे सहायक आयुक्त पुर्णेश गुरुराणी तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भवानी मातेची षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणिक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते भवानी मातेची मनोभावे आरती करण्यात आली.भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाºया भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ढोल, तुताºया, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अविनाश शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपुरे, तहसीलदार रमेश शेंडगे, महाबळेश्वरच्या गटविकास अधिकारी दिलीप शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे आदी उपस्थित होते.मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, तुताºया, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाºया घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला.अश्वारुढ पुतळ्याजवळ पालखीचे शिवरायांच्या आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज’ या ललकारीने अन् शिवरायांच्या जयजयकाराने प्रतापगडावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाºयांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुºहाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.‘वॉटर एटीएम’चे उद्घाटनशिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती प्रतापगड यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या एटीएम मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक