कंत्राटी डॉक्टरांना पुन्हा सेवेत घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:49+5:302021-05-22T04:35:49+5:30
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मंगेश खबाले यांच्यासह डॉ. सुजित भालेकर, डॉ. जोतीराम ढाणे, डॉ. सुनीता खरात, डॉ. योगेश टिकोळे, ...

कंत्राटी डॉक्टरांना पुन्हा सेवेत घ्या!
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मंगेश खबाले यांच्यासह डॉ. सुजित भालेकर, डॉ. जोतीराम ढाणे, डॉ. सुनीता खरात, डॉ. योगेश टिकोळे, डॉ. अनिरुद्ध माने, डॉ. नितीन साळुंखे, डॉ. स्वामिनी चव्हाण, डॉ. शीतल माने, डॉ. अनुजा देशमुख, डॉ. स्वप्नील उदुगडे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बंधपत्रित एमबीबीएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, तसेच संबंधित केंद्रात सध्या कार्यरत असलेल्या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समाप्ती आदेश देऊन कार्यमुक्त करण्यात येत आहे. बंधपत्रित अधिकारी हजर होईपर्यंत तदर्थ अधिकाऱ्यांना सेवेत ठेवण्यात येईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, बंधपत्रित अधिकारी हे नियमित अधिकारी नाहीत. त्यांची सेवा कंत्राटी स्वरूपाची नाही. तदर्थ अधिकाऱ्यांना सेवामुक्त करण्याचा दिलेला आदेशही नियमबाह्य व अन्यायकारक आहे. त्यामुळे संबंधित आदेश रद्द करून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत पुनर्नियुक्ती द्यावी.
अन्यायकारण असलेला सेवा समाप्तीचा आदेश सात दिवसांत रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशाराही तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
फोटो : २१केआरडी०१
कॅप्शन : तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीचे निवेदन कंत्राटी डॉक्टरांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
.....................................................................