शिरवळमधील हिंदू-मुस्लिम ऐक्य वाखण्याजोगे : मुदगल
By Admin | Updated: July 15, 2015 00:44 IST2015-07-14T23:15:17+5:302015-07-15T00:44:38+5:30
इफ्तारपार्टी उत्साहात : नेत्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

शिरवळमधील हिंदू-मुस्लिम ऐक्य वाखण्याजोगे : मुदगल
शिरवळ : शिरवळमधील हिंदू-मुस्लिम व इतर समाजबांधव हे एकत्रित येऊन सर्वधर्म समभावाची भावना जागृत ठेऊन शिरवळची प्रगती साधत आहे. ही गोष्ट वाखणण्याजोगी असून प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.शिरवळ (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्हा पोलीस दल, रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा व शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने आयोजित रमजान इफ्तार पार्टीच्या समारोह प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, खंडाळा पंचायत समिती उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, राजेंद्र तांबे, प्रदीप माने, रोटरी क्लब अध्यक्ष चंद्रशेखर कदम, शिरवळ पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, खंडाळा पोलीस निरीक्षक अशोक शेळके आदी उपस्थित होते. यावेळी आ. मकरंद पाटील, डॉ. अभिनव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सादिक काझी यांनी प्रास्ताविक केले. अॅड. बाळ पंडीत यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)