महामार्गावर स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST2021-06-02T04:28:46+5:302021-06-02T04:28:46+5:30

कऱ्हाड : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वारूंजी फाटा ते विजयनगर हद्दीत दुभाजक उभारण्यात आले आहेत. तसेच सध्या या दुभाजकातील कचरा ...

Highway cleanliness | महामार्गावर स्वच्छता

महामार्गावर स्वच्छता

कऱ्हाड : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वारूंजी फाटा ते विजयनगर हद्दीत दुभाजक उभारण्यात आले आहेत. तसेच सध्या या दुभाजकातील कचरा गोळा केला जात असून, महामार्गाचीही स्वच्छता केली जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

रस्ता खचला

शामगाव : अंतवडी, ता. कऱ्हाड येथील अंतवडी ते मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत विहीर आहे. त्या ठिकाणी रस्ता खचला आहे. परिणामी येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे.

साहित्याची मागणी

कऱ्हाड : लॉकडाऊनमुळे सर्वत्र किराणा दुकाने बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना किराणा माल उपलब्ध होत नाही. दुकाने बंद असल्यामुळे त्यांना साहित्य खरेदीही करता येत नाही. शहरात साहित्याची घरपोहोच सेवा सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात ही सेवा दिली जात नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

धान्यासाठी गर्दी

कऱ्हाड : रेशनिंग दुकानांमधून सध्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे दुकानांमध्ये सध्या ग्रामस्थ गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. धान्य घेण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून दुकानदारांनी धान्याचे वितरण करण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Highway cleanliness