आणेत उंडाळकरांच्या कार्याला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:15+5:302021-01-24T04:19:15+5:30

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग देसाई, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल पाटील, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव ...

Highlight the work of Anet Undalkar | आणेत उंडाळकरांच्या कार्याला उजाळा

आणेत उंडाळकरांच्या कार्याला उजाळा

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीरंग देसाई, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल पाटील, सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव चव्हाण, जयराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब देसाई, आत्माराम देसाई, प्रा. यु. एन. पाटील, बाळासाहेब देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीरंग देसाई म्हणाले, आणे गावाचे आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. कित्येक कोटी रुपयांची विकासकामे त्यांनी गावामध्ये केली. राजकारण, समाजकारण, माणसे जोडण्याचे कसब, सामान्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी बसविणे ही त्यांचे गुणवैशिष्ट्ये होती. सामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती.

दादासाहेब पाटील, श्रीधर देसाई यांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. लक्ष्मण देसाई, गणपती देसाई, रमेश देसाई, अमोल देसाई, माजी शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब देसाई, माजी सैनिक संभाजी देसाई, अशोक आणेकर, शंकर पाटील, भास्कर देसाई, के. पी. पाटील उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : आणे, ता. कऱ्हाड येथे आयोजित सभेत मान्यवरांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याला उजाळा दिला.

Web Title: Highlight the work of Anet Undalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.