शिक्षक सहकाऱ्याच्या कुटुंबियाना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:59+5:302021-02-06T05:13:59+5:30

मलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कचरेवाडाचे मुख्याध्यापक राजेंद्र धुमाळ यांचा कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू ...

Help the teacher colleague's family | शिक्षक सहकाऱ्याच्या कुटुंबियाना मदत

शिक्षक सहकाऱ्याच्या कुटुंबियाना मदत

मलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कचरेवाडाचे मुख्याध्यापक राजेंद्र धुमाळ यांचा कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुणे येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

धुमाळ कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी व सामाजिक बांधिलकी म्हणून निंबळक केंद्रातील शिक्षकांच्या वतीने ४०,००० हजारांचा धनादेश मदत निधी म्हणून देण्यात आला. या कोरोना मदत निधीचे वितरण पंचायत समिती, फलटण येथे पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समिती उपसभापती रेखा खरात, माजी सभापती वसंतकाका गायकवाड, माजी सभापती प्रतिभा धुमाळ, पंचायत समिती सदस्य संजय कापसे सचिन रणवरे, सदस्या विमल गायकवाड, सुशीला नाळे, गटविकास अधिकारी डाॅ. अमिता गावडे, लक्ष्मण गुंजवटे, रुपाली धुमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: Help the teacher colleague's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.