पांचाळ सोनार महामंडळाकडून समाजातील गरजूंना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:40 IST2021-05-09T04:40:29+5:302021-05-09T04:40:29+5:30

मसूर : राज्य पांचाळ सोनार महामंडळाकडून सोनार समाजातील गरजूंना ५६ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश ...

Help to the needy in the community from Panchal Sonar Mahamandal | पांचाळ सोनार महामंडळाकडून समाजातील गरजूंना मदत

पांचाळ सोनार महामंडळाकडून समाजातील गरजूंना मदत

मसूर : राज्य पांचाळ सोनार महामंडळाकडून सोनार समाजातील गरजूंना ५६ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पोतदार यांनी दिली.

प्रकाश पोतदार म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने व्यवसाय पूर्णत: बंद आहेत. बंद व्यवसायामुळे अडचणीत सापडलेल्या ३० लोकांना १५०० रुपये व काही ११ लोकांना १००० रुपये याप्रमाणे ५६ रुपयांची मदत संबंधितांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. या मदतीतून त्यांना अल्पसा आधार मिळाला आहे.’

महामंडळातील सुनंदा घोडके, उज्ज्वला क्षीरसागर, रोहिणी कस्तुरे, धनंजय क्षीरसागर, आदी मान्यवरांनी समाजातील पदाधिकारी, महामंडळाचे पदाधिकारी यांनी आवाहन केल्यानुसार प्रत्येकाने मदत केल्यानेच ५६ रुपयांची मदत झाली.

नरहरी मदत निधीतून समाजातील गरजू, गरीब लोक, विधवा महिलांना जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी झाली.

Web Title: Help to the needy in the community from Panchal Sonar Mahamandal