सातारा : दिवाळी सुटी संपवून मुंबई-पुणे शहराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून जुना पुणे-बंगळुरू महामार्गावर कायम वाहतूक काेंडी होत आहे. ही वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी तसेच नियंत्रण मिळवण्यासाठी साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खंडाळ्याजवळील सेवा रस्त्यावर थांबविण्यात आले. त्यामुळे सकाळपासून येथे माेठ्या प्रमाणावर अवजड वाहने अडकून राहिल्याने जवळपास वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यावेळी वाहनचालकांच्या भावना तीव्र झाल्या. ते म्हणाले, ‘पुण्यात वाहतुकीची कोंडी होत असल्यास महामार्गावर वाहने अडवून त्याचा फायदा नेमका काय? तसेच टोलवसुली होत असताना अशी अडवणूक करून त्रास देणे अन्यायकारक आहे. माल वेळेत पाेहोचू शकला नाही, त्यामुळे हाेणाऱ्या नुकसानीस काेण जबाबदार असणार, वाहतूक नियंत्रण पथकाने याबाबत अगाेदरच नियाेजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीचा आणि मालवाहतुकीचा दोन्हींना अडथळा निर्माण होणार नाही.वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने आर्थिक फटका...वाहतूक नियंत्रक विभागाच्या या निर्णयामुळे अवजड वाहन चालकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. जवळपास चार तासांहून अधिक काळ एकाच जागी वाहने थांबवून राहिल्याने वाहनचालकांचे हाल होत होते. या वाहनांमध्ये नाशवंत माल असल्याने वेळेवर पाेहोच करता आला नाही. त्यामुळे याचा आर्थिक फटका संबंधितांना सहन करावा लागला.
Web Summary : Heavy vehicles were stopped near Khandala to reduce Pune-Bangalore highway traffic due to holiday travelers. Drivers are frustrated by delays and potential cargo spoilage, demanding better traffic management and prior planning to avoid disruptions.
Web Summary : छुट्टियों से लौट रहे यात्रियों के कारण पुणे-बेंगलुरु राजमार्ग पर यातायात कम करने के लिए खंडाला के पास भारी वाहन रोके गए। चालकों को देरी और संभावित माल खराब होने से निराशा है, बेहतर यातायात प्रबंधन और व्यवधानों से बचने के लिए पूर्व योजना की मांग की गई है।