पिंपोडे बुद्रुक परिसरात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST2021-07-07T04:48:37+5:302021-07-07T04:48:37+5:30

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड-दोन तास पडलेल्या जोरदार ...

Heavy rains in Pimpode Budruk area | पिंपोडे बुद्रुक परिसरात दमदार पाऊस

पिंपोडे बुद्रुक परिसरात दमदार पाऊस

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड-दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ऐन गरजेच्यावेळी परिसरात झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

पिंपोडे बुद्रुक व परिसरात गेल्या आठवड्यापासून अधूनमधून ढगाळ वातावरण, तर कधी कडक ऊन असे वातावरण निर्माण होत होते. ऐन खरिपाच्या हंगामात नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना पावसाची नितांत गरज होती. पावसाने पाठ फिरविल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली होती. सोमवारी दुपारी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीला चालना मिळणार असून, परिसरातील पावसाअभावी रखडलेली पेरणीची व इतर कामे मार्गी लागणार आहेत.

०५ पिंपोडे बुद्रुक

फोटो- पिंपोडे बुद्रुक परिसरात सोमवारी झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतात पाणी साचले.

Web Title: Heavy rains in Pimpode Budruk area