शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

Satara: महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:44 IST

चोवीस तासांत १०६ मिलिमीटर पावसाची नोंद

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे चोवीस तासांत १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरात आतापर्यंत ८७०.६० मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागातून देण्यात आली.महाबळेश्वरमध्ये सोमवार सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरूच होती. संध्याकाळी पाचपासून पावसाचा जोर कमी झाला होता. महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठेमध्ये पावसामुळे शुकशुकाट जाणवू लागला आहे. ठिकठिकाणी कोळशाच्या शेगडी पेटवून स्थानिक नागरिक शेकोटीचा आनंद घेत होते. तर मुसळधार पावसाच्या सरीमध्ये पर्यटक, दुचाकीस्वार पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी काही हौशी पर्यटकांची तुरळक गर्दी पर्यटननगरीकडे वळू लागली आहेत. महाबळेश्वर शहरातील नामांकित कपड्याच्या दुकानामध्ये सेल लागल्यामुळे बाजार पेठ परिसरात पर्यटक व स्थानिक नागरिकाची दुकानामध्ये तुबंळ गर्दी दिसून येत आहे.लिंगमळा धबधबा या परिसरातील भागात निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसाळा सुरू झाल्यापासून तर येथील निसर्ग हिरवाईने भरून गेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान