शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, कोयना धरणातून ११ हजार ६४६ क्यूसेकने विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Updated: September 27, 2024 19:27 IST

महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून परतीचा पाऊस जोर धरु लागला आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. तलवांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागला आहे. तरीही या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू लागलाय. काढणीच्या वेळीच पाऊस होत असल्याने नुकसान पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातही पाऊस वाढला आहे. तर पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सहा प्रकल्पात एकूण १४८ टीएमसीवर पाणीसाठा होतो. हे सर्व धरणे भरली आहेत. यामुळे पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६५ तर नवजाला ८० आणि महाबळेश्वरमध्ये ११४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत २३ हजार ७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर सकाळी धरणात १०५.२५ टीएमसी साठा झाल्याने १०० टक्के भरलेले आहे.

त्यातच गुरूवारी सायंकाळनंतर कोयनेत पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. सकाळच्या सुमारास धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि दरवाजातून ९ हजार ५४६ असा एेकूण ११ हजार ६४६ क्यूसेक विसर्ग सुरू होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण