शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात वळवाचा तडाखा, महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

By नितीन काळेल | Updated: May 22, 2025 18:54 IST

रस्त्याला ओढ्याचे स्वरुप; पिके अन् बागांचे नुकसान 

नितीन काळेल सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून वळवाचा धुमाकूळ सुरू असल्याने दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्यात तसेच झाडेही उन्मळून पडलीत. शेती पिकांचे आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्याला ओढ्याचे स्वरुप येत आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.मे महिना सुरू झाल्यापासून वातावरणात मोठा बदल झाला. १५ मे नंतर जिल्ह्यात वळवाचा पाऊस सुरू झाला आहे. मागील काही दिवसांत तर पाऊस पाठ सोडेना अशी स्थिती झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला आहे. सातारा शहरासह परिसरात तर सहा दिवसांपासून पाऊस पडतोय. सोमवारपासून तर धो-धो पाऊस पडत असल्याने रस्त्यावर दगड आणि माती आल्याने राडारोडा झाला आहे. काही ठिकाणी घरात आणि दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले. झाडे पडली आहेत. त्यातच गुरूवारी सकाळपासूनच सातारा शहरात पाऊस सुरू होता. साडे आकरा वाजेपर्यंत पाऊस पडला. यामुळे नागरिकांना छत्री घेऊन तसेच रेनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातही चांगला पाऊस हाेत आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. बंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यात ५५ मिलिमीटर पाऊस..जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडत आहे. २४ तासात महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ५५.७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ३३.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

गुरूवारी सकाळी दहापर्यंतच्या २४ तासांत सातारा तालुक्यात ३४.९ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाटण तालुक्यात ३०.८ मिलिमीटर, कऱ्हाडला ३३.८, कोरेगाव ३४.७, खटाव ३४.५, माण ३४.३, फलटण तालुका २४.३, खंडाळा २५.९ आणि वाई तालुक्यात ३५.१ मिलिमीटर पाऊस झाला. तर सर्वात कमी पाऊस जावळी तालुक्यात ४.१ मिलिमीटर झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान