शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात झाली वाढ 

By नितीन काळेल | Updated: June 22, 2024 19:33 IST

नवजाला ७४ मिलिमीटर नोंद : पूर्व भागात उघडीप साताऱ्यात ढगाळ वातावरण

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा १६  टीएमसीजवळ पोहोचला. तर शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात नवजाला सर्वाधिक ७४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. ६ जूनपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागात यंदा धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे .सध्या जमिनीला वापसा नसल्याने खरीप हंगामातील पेरणी खोळंबलीय. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही. परिणामी खरीपातील पेरणी  यंदा १०० टकके होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसापासून पूर्व भागात पाऊस कमी झाला असलातरी पेरणीसाठी अडचणी येणार नाही. तर पश्चिमेकडे पावसाचा जोर आहे. कास, बामनोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर यासह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तसेच पश्चिमेकडील धरण क्षेत्रातील पाऊस सुरू आहे .यामुळे धरण पाणीसाठा हळूहळू वाढू लागलाय. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ६८ तर नवजाला ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरलाही ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे ५०७, नवजा ६२६ आणि महाबळेश्वरला ४२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसात कोयना धरणात एक  टीएमसीने वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी धरणात १५.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग मागील काही दिवसापासून बंद आहे. 

कोयना धरणात मागीलवर्षी ११ टीएमसी साठा; पाऊसही कमी..जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. तसेच पावसालाही उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला नव्हता. मागीलवर्षी २२ जूनपर्यंत कोयनानगर येथे ७७, नवजा ८४ आणि महाबळेश्वर येथे १०२ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर कोयना धरणात १०.८२ टीएमसी एवढा साठा शिल्लक होता. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण