कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:47+5:302021-07-20T04:26:47+5:30

कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर वाढला असून, चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यातही १.६८ टीएमसीने वाढ झाली ...

Heavy rainfall in Koyna catchment area | कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर वाढला असून, चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यातही १.६८ टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणात ५२.२९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून, २३ हजार ६१६ क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा येथील पर्जन्यमापकावर सर्वाधिक १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, सोमवारी काहीकाळ सूर्यदर्शन वगळता दिवसभर पावसाची धार स्थिर होती. या पावसाने चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात १.६८ टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणातील पाणी पातळी २१०९.१० फूट तर पाणीसाठा ५२.२९ टीएमसी झाला आहे. धरणातील पाण्याची आवक २३ हजार ६१६ क्यूसेकने सुरू आहे. चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात कोयना येथे ६३ मिमी, (एकूण १३३२), नवजा १२२ मिमी (एकूण १८६२) तर महाबळेश्वर १२० मिमी (एकूण १८९३) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १९ जुलैला धरणात ४७.४९ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.

Web Title: Heavy rainfall in Koyna catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.