कास परिसरात जोरदार पाऊस ! दोन तास पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:48 IST2021-02-20T05:48:15+5:302021-02-20T05:48:15+5:30

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजता पावसास सुरुवात होऊन साधारण दोन तास जोरदार पाऊस ...

Heavy rain in Kas area! Two hours of rain! | कास परिसरात जोरदार पाऊस ! दोन तास पाऊस !

कास परिसरात जोरदार पाऊस ! दोन तास पाऊस !

पेट्री :

शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजता पावसास सुरुवात होऊन साधारण दोन तास जोरदार पाऊस झाला. बुधवारी रात्रीदेखील अत्यल्प प्रमाणात साधारण दहा ते पंधरा मिनिटे काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. बुधवारी जमिनीवर केवळ पावसाचा शिडकावा पडला; परंतु आज मोठया स्वरूपात पाऊस झाल्याने खडकाळ जागी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत होते. सध्या काही ठिकाणी गहू काढणी सुरू असल्याने काढलेला गहू भिजून नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच वारंवार आभाळ, कालचा तुरळक पाऊस व आजचा जोरदार पाऊस यामुळे आंब्याचा मोहोर गळून उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या पावसाने कास तलावात पाण्याच्या पातळीत कसलीच वाढ झालेली नाही.

Web Title: Heavy rain in Kas area! Two hours of rain!