शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोयना, नवजाचा पाऊस २०० मिमीच्या उंबरठ्यावर; सातारा जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान अधिक

By नितीन काळेल | Updated: June 12, 2024 18:54 IST

महाबळेश्वरला २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद

सातारा : जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडला आहे.सातारा जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सून पूर्व पाऊस कमी झाला. पण, मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. ६ जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. सुरुवातीला पश्चिम भागातील घाट परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. महाबळेश्वर, कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होण्यास सुरूवात झाली. मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरूवात झाली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे. त्याचबरोबर जावळी, पाटण, कऱ्हाड, वाई या तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.

कोयना धरणात १४ टक्के साठा..सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि नवजालाही अवघ्या पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील ११ दिवसांत कोयनेला १७१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरणात १५.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. टक्केवारीत हे प्रमाण १४.४७ आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ७५ मिलीमीटर पडला आहे. एक जूनपासून महाबळेश्वरला १७१ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.मागीलवर्षी कोयनेला १२ मिलीमीटर पाऊस..गेल्यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला हाेता. तरीही २१ जूननंतरच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे मागीलवर्षी १२ जूनपर्यंत पाऊस कमी होता. त्यावेळी कोयनानगर येथे १२, नवजाला २१ तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक ३६ मिलीमीटर पाऊस पडलेला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस