शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

साताऱ्याला पावसाने झोडपले, ढगांच्या गडगडाटासह चौथ्या दिवशीही हजेरी

By प्रशांत कोळी | Updated: September 7, 2022 18:24 IST

गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फेरले

सातारा : सातारा शहर आणि परिसराला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात सुरू झालेला पाऊस नंतर धो-धो कोसळत होता. यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर पुन्हा पाणी फेरले. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.सातारा शहरात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. दुपारपर्यंत तीव्र उकाडा जाणवतो. त्यानंतर आकाशात ढग दाटून येतात आणि परिसर काळोखून जातो. मग, हळूहळू पावसाला सुरुवात होत जाते. साताऱ्यात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही क्षणातच पावसाने झोडपणे सुरू केले.यामुळे सातारकर नागरिकांची धावपळ उडाली. तर शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांनाही निवारा शोधावा लागला. शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते, तर पावसामुळे वाहनधारकांना लाईट सुरू करूनच पुढे जावे लागत होते. हा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची निराशा झाली.दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ३, नवजा येथे २ आणि महाबळेश्वरला १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ९९.९५ टीएमसी साठा झाला होता. धरणातील विसर्ग बंद आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस